१. सभासद कर्ज रूपये १५,००,०००/- पंधरा लाख
२. आकस्मिक कर्ज रु. २५,००० /- व रु . ५०,०००/-
३. मा. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांचेकडील सुधारीत निर्गमित परिपत्रकांनुसार व संचालक मंडळाच्या बैठकीतील ठरावानुसार कर्ज धोरणात वाढ.
४. कर्जावरील व्याज दर ८.५%, आकस्मिक कर्जावर १२%
५. संस्थेचे सर्व आर्थिक व्यवहार RTGS/NEFT द्वारे केले जातात.
६. दरमहा रेड्युसिंग पध्द्तीने व्याज आकारणी
७. नविन सभासद झालेपासुन सहा महिने पूर्ण झालेल्या सभासदांस कर्ज उपलब्ध.
८. सभासदांच्या मुलांचा शैक्षणिक गुणगौरव कार्यक्रम व मार्गदर्शन. ( इ. ५ वी ते पदवीधर व पदव्यूत्तर )
९. रक्कम संस्थेमध्ये भरणा झाल्यावर तुरंत जमा नावे व्यवहाराचा SMS आपल्या मोबाईलवर प्राप्त होतो.
१०.मयत सभासद वारसास सभासद कल्याण निधीतुन रक्कम रु. ४,००,०००/- मदत केली जाते.
११. सभासदांना ठेव योजना लागू.
१२. रिकरींग ठेव योजना
१३. कर्ज सुरक्षा विमा योजना लागू १४. संस्थेचे सभासद असलेले परंतू पुणे जिल्ह्याबाहेर बदली झालेल्या सभासदांस संस्थेचे पोटनियमानुसार कर्ज वाटप करण्यात येत आहे.
सभासद होण्याची पात्रता
१. वय वर्षे ५० पर्यंत व शासकीय सेवा १२ महिने पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यास सभासद होता येते .
२. पुणे जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय अधिकारी ते चतुर्थश्रेणी कर्मचारी .